Type Here to Get Search Results !

उंबरकर यांच्या पुढाकारातून साकारणार भव्य शिवमंदिर

वणी, शुभम कडू :

                           शहरातील कनकवाडी - देशमुखवाडी येथे महादेव मंदिराचा भूमिपूजन समारंभ मनसेचे राजू उंबरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून हे मंदिर साकार होणार आहे.

    वणी शहरातील कनकवाडी-देशमुखवाडी येथे महादेव मंदिर जागृत स्थान असून स्थानिकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. परंतु शंकर भगवानजींचा हा परीसर उघडा असल्याने याठिकाणी भाविकांना उन,वारा व पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम करून देण्यासाठी स्थानिक महिला भगिनींनी मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांची भेट घेऊन आग्रह करत विनंती केली होती. या विनंतीचा विचार करून महिलांनी व ग्रामस्थांनी केलेली मागणी उंबरकर यांनी मान्य केली व मंदिराच्या बांधकामासाठी स्वखर्चातून निधी उपलब्ध करून दिला. 

        या मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ उंबरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे भाविक भक्तांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. याबद्दल महिलांनी व ग्रामस्थांनी मनसे नेते राजू उंबरकर यांचा सन्मान करून आभार मानले. हे मंदिर लवकरच पूर्णत्वास जाऊन भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले होणार असल्याचे उंबरकर यांनी यावेळी सांगितले. यापुढील काळात देखील आपल्या सर्वांच्या मागणीचा विचार करून आवश्यक ती कामे पूर्ण करण्याचा विश्वास उपस्थित महिला - भगिनींना व स्थानिकांना दिला.

        यावेळी शालिनी रासेकर, वंदना दगडी, मंदा मांदाडे, तुषार नरपांडे, शालु शिखरे, माला ठेंगणे, चारूलता पानघाटे, अल्का रनदिवे, विद्या कापसे, अश्विनी पारखी, कल्पना घागी, प्रा.महादेव घागी, विजय राजुकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, विलन बोदाडकर, गितेश वैद्य, मयूर घाटोळे, मयुर गेडाम, संस्कार तेलतुंबडे, संदीप ठोंबरे यांच्या सह परिसरातील सर्व महिला व नागरिक उपस्थित होते.

           "महादेव मंदिराच्या जागृत देवस्थानचे पवित्र काम करण्याची संधी मला आपण ग्रामस्थांनी दिलीत आणी ते काम मी लवकरात लवकर पूर्ण करेल. या मंदिराचे भूमिपूजन करत असताना मनात भावभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या मंदिराचे काम लवकरच पूर्णत्वास जाऊन भाविकांना दर्शनासाठी खुले होईल याचा आनंद आणि समाधान आहे."

                                 - राजु उंबरकर

                                  - मनसे पक्ष नेता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad