या वर्षीचे आर्थिक वर्ष २०२३-२४ संपत असताना ३१ मार्च आर्थिक वर्ष असल्याने करधारक मालमत्ता कर व पाणी कर भरण्याकरिता न. प. मध्ये येत असतात. परंतू दंडाची रक्कम जास्त असल्यामुळे करधारक कर दंडाची रक्कम कमी करण्याकरिता नगर पालिकेकडे संपर्क करतात, पण नगरपालिकेकडून दंडाची रक्कम कमी करण्यात येत नसून करधारक कर भरताना दिसत नाही. मागील वर्षी १००% दंडाची रक्कम माफ करण्यात आली होती. त्यामुळे न. प. सर्वसाधारण फंडात भरपूर प्रमाणात निधी जमा झाला व नागरीकांनी कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिला या वर्षी ही दंडाची रक्कम १००% माफ करण्यात यावी जेणेकरुन वणीतील करधारक मालमत्ता कर व पाणी कर भरून करमुक्त होईल व न. प. फंडात जास्तीत जास्त निधी जमा होवून शहरातील विकास कामात निधीचा अडथळा निर्माण होणार नाही. याकडे लक्ष देऊन नगरपालिकेकडून त्वरीत दंडाची रक्कम माफ करण्यात यावी अशी मागणी वणी शहर सेवा दल काँग्रेस चे अध्यक्ष प्रमोद गोकुल लोणारे यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी विकेश पानघाटे, विलास कालेकर, रवि कोटेवार, महेश टिपले, सलीम खा, अशोक पांडे, महादेव दोडके, इत्यादी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या