शहरातील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इयत्ता सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित लघुनाट्य तसेच 'आम्ही सावित्री च्या लेकी ' या गाण्यावर नृत्य सादर करून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची व संघर्षाची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली.
मानवी घोसरे हिने 'मी सावित्री बोलते' हा एकपात्री, बोलका प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली तीला आदित्य ऊमक याने महात्मा फुलेंच्या वेशभूषेत साथ दिली. धनश्री मुळे, स्वरा भगत यांनी मी सावित्री बोलते या कविता सादर केल्या तसेच रोहण गौरकार, त्रीशा ढुमणे व धनश्री मुथा यांनी सावित्री बाई फुले च्या जीवनावर भाषणे दिली.👇स्वतंत्र विदर्भासाठी आमरण उपोषणाचा समर्थनात रस्ता रोको आंदोलन 👇 Click News
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या