Type Here to Get Search Results !

संभाजी ब्रिगेड चे वतीने फळ वाटप आणि ग्रंथ भेट उपक्रम

वणी, शुभम कडू : 
                           मराठा सेवा संघ प्रणित "दशरात्रौत्सव २०२४ " निमीत्य फळ वाटप आणि ग्रंथभेट कार्यक्रम संपन्न झाला. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर यांचे जन्मदिवसाचे औचित्याने महाराष्ट्रात सर्वत्र हा दिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा केल्या जातो.

        संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांचे पुढाकारातून दि. ०४ जानेवारीला स्थानिक ग्रामीण रुग्णालय वणी येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. सोबतच याच दिवसाचे औचित्याने रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना पुरूषोत्तम खेडेकर लिखीत पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विधीज्ञ अमोल टोंगे, शंकर पुनवटकर, भाऊसाहेब आसुटकार, संजय गोडे, वसंत थेटे, दत्ता डोहे, आशिष रिंगोले ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad