मुकुटबन येथिल आरसीसीपीएल कंपनी तर्फे खान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्लांट प्रमुख म्हणून श्री.जयंत कंडपाल तर सर्वेक्षण टीम चे कनवेयर, श्री.महेश गायकवाड (AGM mines M/S Soil), श्री. विशाल कुशवाहा (Asst. Mngr m/s भारतीय मिनरल्स ), श्री.मल्लिका अर्जुन चेरी (डेप्युटी मॅनेजर मेक्यानिकल, m/s UTCL Awalpur ) , खान प्रमुख श्री.क्रिष्णकुमार राठोड, खान प्रबंधक श्री अतुल वडेट्टीवार तथा सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम पिंप्रडवाडी शाळेतुन सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी शालेय मुलांकडून व खान कर्मचारी आणि कामगार यांच्या कडून स्लोगन पोस्टर लावून त्यांना कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आले. खान कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच होणारे अपघात रोखण्याच्या दृष्टिकोनातून कामगारांना सुरक्षित कसे ठेवता येईल या विचारसारणीतून क्रॅश हेल्मेट वितरित करण्यात आले. तसेच DGMS द्वारा आयोजित ACC प्लांट मध्ये FIRST Aider मुकुटबन माईन्स टीम ला बेस्ट first aider टीम ला बक्षीस देत गौरविण्यात आले. प्लांट हेड श्री.जयंत कंडपाल यांनी सुरक्षा बाबत अमूल्य असे मार्गदर्शन करीत उपस्थितांना सुरक्षा ही नेमकी कशा पद्धतीने केली जाते तसेच खान मध्ये होणारे विविध अपघात यातून आपण सुरक्षित राहून कसे सुरक्षित राहावे याबद्दल बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. टिम संयोजक श्री.गायकवाड जी आणि निरीक्षण टीमने मुकुटबन लाइमस्टोन आणि डोलोमाइट खाणकामाची पाहणी केली.
यावेळी खाणी संपूर्ण DGMS नियमांनुसार कार्यरत असल्याचे आढळले. खान प्रमुख श्री. क्रिष्णकुमार राठोड यांनी सुरक्षा बाबत माहिती दिली. आभार प्रदर्शन खान प्रबंधक श्री.अतुल वडेट्टीवार यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या