वणी/प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. दि.२७ जानेवारी ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान आज बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याची अंत्ययात्रा दुपारी ०३:०० वाजता विठ्ठलवाडी येथील त्यांचे राहते घरुन निघणार असून मोक्षधाम वणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या