Type Here to Get Search Results !

शांतता कमिटीच्या सदस्यांनी बैठकीवर टाकला बहिष्कार

वणी/प्रतिनिधी : 

                      अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम, शिवमहापुराण कथा, शिवजयंती, मराठा / ओबीसी आंदोलन संबधाने शांतता समितीची बैठक दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी शुक्रवारी सायंकाळी ०५:०० वाजता वणी पोलीस स्टेशनच्या पटांगणावर बोलावण्यात आली होती. परंतु ०६:०० वाजल्यानंतरही कुणीही अधिकारी न आल्याने उपस्थितांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत निघून गेले.

                यावेळी शांतता कमेटीचे सदस्य रवी बेलुरकर, राजाभाऊ पाथ्रडकर, मंगल तेलंग, चंदर फेरवाणी, शाहीद खॉन, कदीर शेठ, लतीफ खॉन, इम्रान खान, नसुरुद्दीन शेख, विजयाताई आगबत्तलवार, बांगरे ताई, वडीचार ताई, पत्रकार डॉ. चवणे, सुरेंद्र इखारे, परशुराम पोटे, संतोष पेंदोर, नरेंद्र लोणारे, रवी कोटावार, महादेव दोडके, मनोज नवले, यांच्या सह अनेक शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित झाले होते मात्र पाच वाजता बोलाविण्यात आलेली सभा सहा वाजून गेले तरी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे उपस्थित सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि घराकडे निघून गेले. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली आणि काही उपस्थित सदस्यांना बैठकीला येण्याची विनंती केली मात्र उपस्थित मान्यवर निघून गेले होते. त्यानंतर मागावून काही सदस्यांना विनवणी करून बैठकीला बोलाविण्यात आले. परत गेलेले सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले नाही, परंतु काही मोजक्याच सदस्यांनी या बैठकीला उपस्थिती दाखविली.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad