पळसोनी परिसरात दि. २७ जानेवारी पासून श्री काशी शिवमहापुरानकथा हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमा साठी भारतातील अनेक राज्यांतील शेकडो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. परसोडा येथे चालु असलेल्या काशी शिव महापुरान कथा ऐकण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नंदनशीवनी येथील चंपाबाई ज्ञानेश्वर जाधव ह्या आपल्या माधव ज्ञानेश्वर जाधव वय २८ मतीमंद मुलाला कथा ऐकण्यासाठी दि. २७ जानेवारी पासुन आल्या होत्या. काल दि.२८ जानेवारी ला दुपारी १२:०० वाजता मतीमंद मुलगा हजारोंच्या गर्दीतुन कुठेतरी निघून गेला त्यास बोलता येत नसुन स्वत: चे नाव सुध्दा सांगता येत नसलेल्या इसमाची तक्रार कथा स्थळावरील पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच गणेश किंद्रे उपविभागीय पोलिस अधिकारी वणी व अजित जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांनी ही माहिती पोलीस अधिकारी व अमलादार यांना त्वरीत देण्यात आली.
त्या मुलाचा पोलिसांनी दिवसभर शोध घेतला असता घोन्सा रोड रेल्वे पटरीचे बाजुला एक मतीमंद इसमा आहे. अशी माहिती मिळताच तिथे जाऊन त्यास घेऊण API माधव शिन्दे, PSI कांडुरे, PSI गुल्हाने अंमलदार श्रीनिवास यांनी त्यास कथा स्थळी आनुण त्यास त्यांचे आईचे ताब्यात देण्यात आले. मतीमंद इसमाचा शोध घेऊन त्यांस त्यांचे आईचे ताब्यात देऊन हि खुप मोलाची कामगिरी पार पाडली आहे. त्यामुळे वणी पोलिसांवर सभास्थळी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या