तलाठी भरती तात्काळ रद्द करा आक्रोश मोर्चातून विद्यार्थाची मागणी
SK News Channel0
वणी/प्रतिनिधी : संपुर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा खुप मोठा युवा वर्ग आहे. परंतु सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जो घोळ चालला आहे त्यामुळे विद्यार्थी वर्ग संतप्त झाला आहे. काही ठिकाणी तलाठी भरतीत २०० पैकी २१४ गुण देण्यात आल्याच्या घटना घडल्याने घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
TCS/IBPS मार्फत संपुर्ण महाराष्ट्रात विविध पदांच्या परिक्षा घेण्यात येत आहे. त्यात प्रचंड गोंधळ होतांना दिसत असुन अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. यामुळे विद्यार्थ्यांत संतप्त भावना निर्माण झाली असुन वणीतील हजारो विद्यार्थ्यांनी आज दिनांक ११ जानेवारीला दुपारी आक्रोश करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.
राज्यात तलाठी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, ही भरती रद्द करुन नव्याने भरती घेण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पेपरफुटी संदर्भात कठोर कायदा करुन त्या कायद्यानुसार दोषींवर कडक कार्यवाहिची तरतूद करावी, रखडलेली पोलीस भरती तात्काळ घेण्यात यावी व भरतीची जाहिरात आचारसंहिता लागण्यापुर्वी देण्यात यावी, शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी व नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
👉 👉 वणीतील Rotary उत्सवमध्ये लोकांची प्रचंड गर्दी 👇👇
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या