वणी/प्रतिनिधी : येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवार चौकात बेलदार समाज बहुउद्देशिय संस्था, वणी तथा युवा शहर कार्यकारिणी वणी यांच्या वतीने दि. १०/०१/२०२४ बुधवार कर्मवीर दादासाहेब कन्नमवार (दिवंगत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या १२४ व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीपभाऊ बोनगीरवार तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव पांडुरंगजी ताटेवार सर, माजी न.प. बांधकाम सभापती राकेशभाऊ बुग्गेवार आणि बेलदार समाज महिला कार्यकारिणी अध्यक्षा अल्काताई दुधेवार हे होते. यावेळी अतिथीनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांच्या पुतळयाचे पूजन व हारार्पण केले.यावेळी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार, सचिव पांडुरंग ताटेवार यांनी आपल्या मनोगतातुन कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच माजी सभापती विजय पिदूरकर, सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडे यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यकमाला ज्ञानेश्वर बोनगीरवार, अशोक ठाकूरवार, पुरुषोत्तम कोमरेड्डीवार, प्रकाश पत्तीवार, उमाकांत जामलीवार, प्रविण येलपुलवार, विनोद महाजनवार, मनोज मसेवार, राजू बोईनपल्लीवार, श्रीकांत पोचमपल्लीवार, राजू बोरगमवार, प्रणय फेथफुलवार, संजय बोरगमवार, श्रीकांत पत्तीवार प्रफुल आयतवार, चेतन ताटेवार विलास मुत्यलवार, सुरेश चिट्टलवार, विजय आकिनवार, सरलाताई येलपूरवार, रसिकाताई बेझलवार, सुवर्णाताई बेझलवार, वैशालीताई मारगमवार, सुनिताताई वेलफूलवार, शालिनीताई घाग्रेडवार, पूजाताई बुग्गेवार, सिमाताई बोनगीरवार, सुरेखाताई कोमरेडीवार, भावनाताई पोचमपालीवार, काजल पुरमशेट्टीवार, संगीताताई पुरमशेट्टीवार, चंदाताई पुरमशेट्टीवार, स्वातीताई पुरमशेट्टीवार, आदी समाजबांधव, सल्लागार मंडळी, संस्था पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राकेश बरशेट्टीवार आणि आभार गजानन चंदावार यांनी केले.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या