वणी, शुभम कडू : मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील आमलोन या गावातील शेतकऱ्याने आज दि. १९ डिसेंबर ला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले आहे. शेतकऱ्याचे नाव आनंदराव शंकर मेश्राम असून अंदाजे वय ५० वर्ष होते. कुटुंबीय हे वणी ला गेले असताना घरी कोणी नसताना शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केले. शेतकरी आनंदराव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलेले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या