जगन्नाथ बाबा देवस्थान भांदेवाडाला संजय खाडे यांच्यातर्फे स्वच्छता मशीन भेट
0
वणी, शुभम कडू : विदेही सद्गुरू जगनाथ बाबा देवस्थान भांदेवाडा येथील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संजय खाडे, अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी. यांच्या तर्फे दोन स्वच्छता मशीन भेट म्हणून देण्यात आल्या. या प्रसंगी भांदेवाडा संस्थानचे अध्यक्ष बबनभाऊ धानोरकर, पुरुषोत्तमजी आवारी, प्राचार्य शंकररावजी वऱ्हाटे, नागोबाजी आवारी, माजी सरपंच गणेशपुर तेजराजजी बोढे, रंगनाथस्वामी अर्बन निधीचे संचालक ईश्वर खाडे, धनंजय खाडे, रोशन ठाकरे आदी उपस्थित होते. या दोन स्वच्छता मशीनमुळे परिसरातील वातावरण स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल, असे मनोगत संस्थानचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या