Type Here to Get Search Results !

मोहद येथे संभाजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वाटप

मोहद (ता. वणी, जि. यवतमाळ) : 

                     संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व छत्रपती महोत्सव समितीचे अध्यक्ष मा. गणेशजी बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा, मोहदा येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचे वाटप करण्यात आले.

        गणेश बोंडे हे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून सतत समाजजागृतीचे कार्य करीत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. छत्रपती महोत्सव समितीच्या माध्यमातून ते दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करून व्याख्यानमालेद्वारे समाजप्रबोधन घडवतात. याचबरोबर 19 फेब्रुवारी 2025 रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून देण्याचे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे.

           कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी विद्यार्थ्यांना शालेय भिंतीवर लिहिलेल्या सुविचारांचे महत्त्व पटवून सांगितले. ते दररोज वाचून अंगीकारल्यास आयुष्य सुजलाम-सुफलाम होईल, असे त्यांनी सांगितले.

              कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मा. वाघमारे सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे भाऊसाहेब आसूटकर,संभाजी ब्रिगेडचे आशिष रींगोले, माजी सरपंच वामनराव उईके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप ढुमणे, माजी उपसरपंच विशालभाऊ कुचनकर  प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत कुचनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

                 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार वडस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल पावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल शेलवडे, वैभव मडावी, अमोल पुनवटकर, श्रीकांत देठे, स्वप्नील बोथले, गजानन टेकाम यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad