वणी :
येथील श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थाद्वारा संचालीत वणी पब्लिक स्कूल व राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा पालकांकरीता नेत्रोदय आय हॉस्पिटल द्वारे नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनिय कार्यक्रमात प्रमुख अतिथी नेत्रोदय आय हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल गोहोकार आणि डॉ. कोमल गोहोकार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव ओमप्रकाशजी चचडा होते.
"आरोग्यम धन संपदा" या सहशालेय उपक्रमाचे औचित्य साधून वरील दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. स्वप्नील गोहोकार म्हणाले कि 'नेत्र शास्त्रार्थ लोचनम' विस्तृत करताना डोळे हे आपल्या जीवनातील महत्वपूर्ण अंग असून त्यांची निगा राखण्याची आज नितांत गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तद्वतच मोबाईल पाहणे बंद आणि मैदानी खेळ जास्त भर देण्याचे शपथमंत्रही त्यांनी यावेळी दिली. मुख्याध्यापक श्री. अभय पारखी सरानी भाषणातून पुस्तक वाचताना येणार्या अडचणी व मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्याचे आव्हान केले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे आधुनिक यंत्रणेने तपासणी करण्यातआली.जवळपास दोन्ही शाळेतील ८०० विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. यापैकी प्रणय चिव्हाने, आशु यादव, हुमैरा कुरेशी, प्रियांशु प्रजापती, माही शेख, प्रिती वाघडकर आदी विद्यार्थ्यांना तपासणी अंतर्गत समस्या दिसून आल्या.
नेत्र तपासणी शिबीराचे प्रास्ताविक श्री.गंगारेड्डी बोडखे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रणोती खडसे व सौ.अनिता गौरकार यांनी केले व आभारप्रदशर्रन श्री.प्रभुदास नगराळे व सौ.उलमाले मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता सर्वांना आय ड्राॅप देवून झाले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिश लखमापुरे, तुषार घाणे, भाग्यश्री लांडे, सौ.जेणेकर, कु. गोखरे, सौ.गौरकार, सौ.बोरकर, सौ.बरडे, श्री. राजेंद्र देवतळे, सुनिल गेडाम, हरिदास वासेकर, हरिदास बोढाले, जितेंद्र डगावकर, संतोष भाऊ, स्वप्नील ईत्यादींनी अथक प्रयत्न केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या