वणी :
सावित्रीबाई फुले दत्तक पालक समितीद्वारा 2001 पासून कोणतीही मुलगी शाळेच्या प्रवाहापासून वंचित राहू नये यासाठी समाज सहभागातून दत्तक– पालक उपक्रम सुरू केला होता. आता शासनाद्वारे आवश्यक सर्व साहित्य पुरविण्यात येत असल्यामुळे यावर्षीपासून हा उपक्रम बंद करून वर्ग 9 व 10 वी च्या आर्थिक दृष्टीने मागास विद्यार्थ्यांना पूर्ण पाठ्यपुस्तक देऊन पुस्तक पेढीचा उपक्रम सुरू केला आहे.
जैताई मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष किशन खुंगर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिन गाडे व चंद्रकांत फेरवाणी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला शाळा क्र. 7 च्या विद्यार्थिनी वैष्णवी बघेल, अरेन्सी बघेल, अर्पिता क्षीरसागर, सुहानी पिंपळकर, आदिती सरोदे यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनंतर डॉ. सचिन गाडे यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगून आर्थिक दृष्टीने मागास विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिल्याने त्यांच्यात शिकण्याची जिद्द निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपण या आयोजन समिती सोबत 2001 पासून जुळून असल्याचे सांगून या समितीने अगदी योग्य असा बदल करून पुस्तक पेढीचा उपक्रम सुरू केल्या बद्दल समितीचे कौतुक केले.
वणी शहरातील आदर्श शाळेचे 20, जनता विद्यालयाचे 20 व नुसाबाई विद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांना वर्ग 9 व 10 वी च्या पाठ्यपुस्तकांचे वितरण अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सदस्य लक्ष्मण इड्डे यांनी केले. सूत्रसंचालन समितीचे सचिव गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चटप यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या