Type Here to Get Search Results !

प्रहार जनशक्ती पक्ष वणी करणार शेतकरी कर्जमाफीसाठी साखळी उपोषण

वणी : 

           शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणे.  दिव्यांग बांधव यांना ६०००/- रूपये मासिक मानधन देण्यासाठी सर्व कार्यकर्ते मा. बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष, संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख बिपिन चौधरी, आशीष तुपटकर यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख मुबिन शेख, तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे, तालुकाप्रमुख प्रहार शेतकरी संघटना रघुवीर कारेकर, तालुका सचिव मुन्ना येरेकर, प्रहार वाहन चालक शहरप्रमुख सचिन राखुंडे यांनी ०९ जूनला सोमवारी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण करणार आहे.

                             महाराष्ट्र शासनाच्या निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या पक्षाची निवडणुक जाहिरनाम्यात आम्ही निवडुण आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला ७ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिध्द झालेले आहे. अशी परिस्थिती असतांना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. अशी जनतेला साद घालुन निवडुण आलेले आमदार कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भुमिका घेत नाही.

                   यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे. आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजुर करून सर्व शेतकरी व दिव्यांगा बांधवाना न्याय द्यावा, याकरीता हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad