Type Here to Get Search Results !

प्रतिबंधित बीटी बियाणवर कारवाई करा, दलाल सक्रिय असल्यामुळे उत्पादन प्रभावित

वणी : 

           प्रतिबंधित बीटी कापसाचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे दलाल विविध सीमावर्ती भागात सक्रिय झाले आहे. शेतकऱ्यांना विविध आमिष देत त्यांची फसवणूक केल्या जाऊ शकते. या प्रतिबंधित बीटी बियाणांचा वापर केल्यास उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम आता केवळ एक महिन्यावर आला आहे. यंदा ९० टक्के पावसाचा अंदाज पर्यावरण विभागाने व्यक्त केला आहे. विविध नावाने प्रतिबंधित बीटी बियाण्यांची विक्री केली जाऊ शकते. या बियाण्यांवर केंद्र सरकारच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध लावला आहे.अशा बोगस बियाण्यांवर कोणत्याच प्रकारचे तंत्रज्ञान, वान व बियाण्यांच्या गुणवत्तेचे विवरण राहत नाही.

             बियाणे कायदा १९५५ कापूस बियाणे अधिनियम २००९, वजन व मापे कायदा कलम ६ कापूस किंमत कायदा २०१५ अंतर्गत व जीवनावश्यक कायदा १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे, प्रहार शेतकरी तालुकाप्रमुख रघुवीर कारेकर यांनी केली आहे. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image