प्रतिनिधी / वर्धा (मंगेश राऊत ) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेली ३५ वर्षापासून अधिकृतपणे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा दरवर्षीला प्रकाशित होणारा विषेशांकांचे प्रकाशन वर्धा जिल्ह्याच्या नुकत्याच रूजू झालेल्या जिल्हाधिकारी मा वान्मथी सी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात त्याच्याच दालनात प्रकाशन करण्यात आले.
शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी ९ऑगष्ट १९८९ रोजी काही निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र पणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली एक एक कार्यकर्ता जोडत संपूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक प्रदेशात समितीचे काम उभे केले या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे विवेकाचे भरणपोषण करण्यासाठी व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम सोपे काम जे संत पुरोगामी विचारवंतांनी विचार समाजासमोर मांडले ते जनसामान्यांना पर्यंत पोहचविण्यासाठी समितीचे मुखपत्र म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका हे मासिक सुरू करण्यात ज्यात अंधश्रद्धा निर्मूलन या विषया सोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण, आरोग्य, स्त्री पुरुष समानता, विज्ञान तंत्रज्ञानातील नवं नविन संशोधन, प्रयोग यांची शास्त्रीय माहिती देणारे हे एकमेव मासिक आहे ज्याचे आज दहा हजार च्या वर सभासद असून वार्षिक विशेषांकाच्या माध्यमातून मिळणा-या आर्थिक मदतीतून वर्षभराचे प्रबोधन,मोहिमा,बैढका, कार्यक्रम, अधिवेशन संमेलन याचा खर्च केला जातो.
समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह डॉ माधुरी झाडे, विवेक वाहिनीच्या जिल्हा कार्यवाह डॉ मंजुषा देशमुख वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण विभागाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे कार्यकर्ते आदित्य सातारगाडगे अनिकेत खेडकर श्रीकांत नगराळे गौरव कुंबरे सिमा भोयर, जीत जगताप रोहन पोहूलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या