कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम वाचनालयाचे सचिव प्रा. विजय बोबडे सर यांनी सूत्रसंचालन करताना सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाचनालयात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न
0
वणी :
महाराष्ट्र शासन परिपत्रक दि. २० डिसेंबरमधील दिलेल्या निर्देशांनुसार सर्वत्र वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीचे औचित्य साधून सामूहिक ग्रंथ वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक ०३ जानेवारीला करण्यात आले होते.
यानंतर विद्यार्थी/वाचकांचे सामूहिक ग्रंथ वाचन आणि विद्यार्थांचे प्रकट वाचन घेण्यात आले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच वाचन-कौशल्य विकसित व्हावे यादृष्टीने ग्रंथालयात "वाचन कौशल्य कार्यशाळा" या कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. अनिलकुमार टोंगे सर यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या प्रसिद्ध ग्रंथांचे संदर्भ देत वाचकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
वाचकांना वाचनाचे महत्त्व तसेच पुस्तकांचे जीवनातील महत्त्व काय असते ? जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकांची संगत धरावी लागेल जो पुस्तकांच्या संगतीत राहतो तो आयुष्यात यशस्वी होतो, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. टोंगे सर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष अशोक चौधरी सर, मोहनराव हरडे सर आणि प्रभाकरराव मोहितकर सर यांनी वाचन का करावे वाचनाची गरज व महत्व या बाबत सविस्तर माहिती वाचकांना दिली. या कार्यक्रमाला वाचनालयाचे कर्मचारी आणि वाचक/विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे व वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर सर यांनी अध्यक्षीय भाषणातून दि. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत आज वाचन कौशल्य कार्यशाळा आणि सामूहिक ग्रंथ वाचन या उपक्रमांमध्ये वाचक/विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे लेखक-वाचक संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरीही सदरील कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, वाचक सभासद, वाचन प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार संचालक सुरेश राजूरकर यांनी मानले.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या