वणी :
शहरात गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या असून गुन्हेगारी प्रवृत्तीपुढे पोलिस प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीत होत असलेली वाढ बघता गुन्हेगारांवर पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. शहरात अवैध धंदे, अवैध रेती वाहतूक, अवैध वाहतूक, अवैध वसुली, झंडीमुंडी, मटका जुगार, गांजा, नशिले पथार यासह भाईगिरीला अक्षरशः उधाण आलं आहे.
सदरची अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही न केल्यास श्रीराम नवमी समिती पोलिस प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने थातुरमातुर कार्यवाही करण्यात येत असून शहरात अवैध धंदे जोरात सुरू आहे. त्यामुळे दि. ०३ जानेवारी अर्थातच आजपासून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे, असे रामनवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी सांगितले आहे.
शहरात दिवसेंदिवस अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे नाही तर गोंधळ उडाला आहे. भर रस्त्यावर चारचाकी वाहने उभी दिसतात परिणामी वाहतूक जाम होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. ऑटो रिक्षा चालकांच्या तर दादागिरीला उधाण आले आहे. अक्षरशः धुमाकूळ घातलाय.
तसेच शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी मंडईत तर भाजी विक्री चे दुकान कमी मात्र मटका पट्टी चे जास्त दिसून येत आहे. मात्र पोलिसांना दिसून येत नाही हे आश्चर्यच आहे. त्यामुळे आता हे अवैध धंदे आता रामनवमी समितीच्या रडारवर आले आहेत.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या