वणी :
भीमा कोरेगाव विजयी शौर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि. १ जाने. २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे सकाळी मानवंदना देऊन ७.३० वाजता मोफत रक्त गट तपासणी शिबीर घेण्यात आले.
तसेच सायंकाळी ६.३० वा. शुरविरांना अभिवादन आणि सन्मान समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय नगराळे व प्रमुख अतिथी म्हणून प्रा.पुरुषोत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष करूणा कांबळे, सुरेश रायपूरे, मोरेश्वर देवतळे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सुरेश मोडक यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजा मध्ये सामाजिक कार्यात व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर व्याख्याते दत्ता डोहे यांनी भिमा कोरेगांव शुरविरांचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले.
या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी द ग्रेट पिपल्स गृपच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या