सर्व प्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पन करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नवनाथ नगराळे यांनी केले. त्यानंतर उपाध्यक्ष एस.एस. सोनारखन यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली. स्त्री जिवनात नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले असे ते म्हणाले. सावित्रीबाई व ज्योतीरावच्या कार्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात घटनात्मक दर्जा दिला असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार वस्तीगृहाचे अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक कैलाश वडस्कर यांनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या