Type Here to Get Search Results !

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमीत्य प्रा.प्रविण देशमुख यांचे व्याख्यान

वणी : 

         स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि सामाजिक क्रांतीच्या प्रेरणास्थान  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब या दोन्ही महानायिकांचा जयंती सोहळा हा दशरात्रौत्सव पर्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजऱ्या केल्या जातो.याच दशरात्रौत्सव 2025 निमित्त दिनांक 3 जानेवारी  ला जिजाऊ ब्रिगेड वणी शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक वसंत जिनिंग हॉल येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित या सोहळ्याला यवतमाळ येथील प्रसिद्ध प्रबोधनकार आणि व्याख्याते प्रा. प्रवीण देशमुख यांचे प्रमुख संबोधन होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास जिजाऊ ब्रिगेड,मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच समाज बांधवांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड वणीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad