Type Here to Get Search Results !

पोलिस व वाहतूक विभागाच्या विरोधात रवि बेलूरकर यांचे वणीत धरणे आंदोलन

वणी :
         तालुक्यातील वणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे (मटका, जुगार, कोंबडबाजार, झंडीमुंडी, चेंगळ, कोळसा तस्करी, रेती तस्करी, ड्रग्स, सुगंधीत तंबाखु गुटखा, गांजा) या सारखे अवैध धंदे त्याच प्रमाणे घरफोडी चोरी व मोठ्या प्रमाणात गोहत्या सर्रास सुरु असल्यामुळे वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच वणी शहरात अवैध वाहतुक, बेधुंद टुव्हिलर गाडी अल्पवयीन मुले चालवित असून तसेच वणी शहरात ऑटोचा थैमान मुख्य मार्गाने दिसून येत आहे. यावर वाहतुक शाखेचे नियंत्रण नसल्यामुळे अवैध ऑटोचालकांची अरेरावी प्रत्यक्ष नागरीकांना पहावयास मिळत आहे.

            वणी शहर हे शांतताप्रिय असून जातीय धर्माचा कुठलाही वाद नसून सर्व नागरीक सलोख्याने राहतात परंतू वणी पोलीस प्रशासनाच्या तसेच वाहतुक शाखेच्या पोलीस विभागाचा वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नसून वणी शहरात अवैध धंद्याला पुर्णतः मोकळीक पोलीस प्रशासनाने दिली असून अनेक अवैध धंद्यांना उत आलेला दिसत आहे. यामुळे वणी तालुक्यातील असुरक्षितेचे वातावरण, भितीचे वातावण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाचा ज्या प्रमाणे धाक निर्माण असायला पाहीजे तो नाहीसा झालेला दिसत आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचे डोके वर आले आहे.

                या सर्व बाबींवर विचार करुन वणी येथील रामनवमी उत्सव समिती तसेच समाजातील विवीध संघटनांनी व सुज्ञ नागरीकांनी दि. ९ जानेवारी ला जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना निवेदन देवून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. वणीतील होणाऱ्या या सर्व विविध घटनेचा निषेध म्हणून दि. १७ जानेवारीला १ दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्याचा इशारा रामनवमी समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांना दिला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad