विद्येची देवी शारदा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून 'मानवता ही सेवा धर्म' या लायन्स प्रेअरने, स्वागत गीत व नृत्याने कार्यक्रमाची सुंदर व शिस्तबद्ध सुरुवात झाली. प्रारंभी दिवंगत सदस्य स्वर्गीय नरेंद्रजी नगरवाला, डॉ एन सी शेख, डॉ घनश्यामजी उमरे, श्री पी आर बत्रा, ओमप्रकाशजी खत्री, बशीर खान,ऍड अनंतराव देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लायन अजय सिंग यांचे हस्ते रिजन चेअर पर्सन डॉ श्रीकांत जोशी, डिस्ट्रिक्ट ऑफिसर प्रमोद कानेटकर, संस्थापक सदस्य प्रमोद देशमुख, शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर होते.
शाळेचे अध्यक्ष श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रास्ताविक करून संस्थेची व शाळेची पन्नास वर्षाची सुंदर वाटचाल कौतुकास्पद असून संस्थेने अनेक गुणी व प्रज्ञावान विद्यार्थी घडवले, देशविदेशात व विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत संस्थेने आपल्या परीने समाजसेवा केली, यापुढे समाजाला निशुल्क व माफक दरात आरोग्य सेवा देण्याचा मानस व्यक्त केला.
तसेच लायन्स क्लब वणीच्या सेवा कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी अजय सिंग व डॉ. श्रीकांत जोशी यांनी आपल्या मनोगतांतून व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी लायन्स क्लब वणीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास व गौरवास्पद कामगिरीची माहिती देऊन त्यात सर्व सदस्य, शाळेचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा अमोल वाटा असल्याचे सांगितले.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने अतिथी अजय सिंग, डॉ श्रीकांत जोशी, प्रमोद कानेटकर, पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी तसेच लायन्स क्लब चे सन्माननीय माजी अध्यक्ष व सदस्य लायन नरेंद्र बरडिया, लायन सुधीर दामले, लायन सौ मंजिरी दामले,लायन रमेश बोहरा तसेच लायन तुषार नगरवाला यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन हृदय सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील उत्कृष्ट खेळाडू स्वरा मंगेश करंडे (क्रिकेटपटू), त्रिशा मारुती कोंडागुर्ले(बुद्धीबळ) विविध स्पर्धा व उपक्रमांत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, क्लबचे सचिव किशन चौधरी, शांतीलाल पांडे, महेन्द्र श्रीवास्तव, पुरूषोत्तम खोब्रागडे, सौ विणा खोब्रागडे, सुनीता खुंगर व प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण बुजोणे व सौ सोनाली काळे यांनी केले तर संस्थेचे अकॅडेमीक डायरेक्टर व माजी प्राचार्य प्रशांत गोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, निमंत्रित व पत्रकार उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या