दिनांक 12 जानेवारी 2025 ला राष्ट्रीय कराटे स्पर्धा ( वर्धा सेवाग्राम ) येथे ट्रॅडिशनल शितो रियो कराटे अँड कुबुदो ऑर्गनायझेशन इंडिया च्या वतीने घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ट्रॅडिशनल शीतोरियो इंडिया चे अध्यक्ष श्री शिहान शेख दत्तू सर व सचिव कृष्णा ढोबळे व श्री पराग पाटील सर होते. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये वणीच्या विद्यार्थ्यांनी काता व कुमिते या प्रकारात खालील विद्यार्थ्यांनी पदक प्राप्त केले.
यामध्ये कृष्णा त्रिवेदी दोन सुवर्णपदक, आभीर हरेन्द्र देठे एक सुवर्ण एक कास्य, आर्य अमोल मस्सेवार एक सुवर्ण एक कास्य, संस्कार मेश्राम एक सुवर्ण एक कास्य, श्रीहर्ष कैलास दासरवार एक रोप्य, कु. प्रांजली विजय ठक एक सुवर्ण एक रोप्य, कु. सर्वदा नरेश मुरस्कर एक सुवर्ण एक कास्य, नेहा विनोद गव्हाणे एक सुवर्ण एक कास्य, ईश्वरी संतोष सोनुले एक रोप्य एक कास्य , ओवी महेश ठाकरे एक कास्य, आर्वी सुमित मुथा एक रोप्य, सृष्टी निलेश लुतळे एक सुवर्ण, एक कास्य हे आहेत.
ही सर्व मुले वणीतील श्री गजानन महाराज मंदिर न्यू व्हिजन शाळा जवळील कराटे क्लबमध्ये सराव करत आहेत. त्यांच्या यशासाठी मुख्य प्रशिक्षक सेन्साई नरेश मुरस्कर, सेन्साई शारदा ठक, अनिरुद्ध डाफे, यशवंत टेकाम, आणि प्रथमेश कनाके यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि प्रशिक्षक यांना दिले असून, वणी शहरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या