Type Here to Get Search Results !

दुर्गा मातेचा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दीन उत्साहात साजरा

वणी : 

       शहरातील आंबेडकर चौक परिसरात असलेल्या नवशक्ती  मंडळ येथील मंदिरात दुर्गा माता स्थापनेला 27 वर्ष पूर्ण झाले 10 जानेवारी ला मातेचा वर्धापन दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळेस माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी मंदिराला भेट देवून मातेचे दर्शन घेतले मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या सिंहाच्या  मूर्तीचे लोकार्पण वणीचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस उपमुख्याधिकरी जयंत सोनटक्के उपस्थित होते.
      वर्धापन दिनानिमित्त सकाळी 6.00 वाजता मातेचा अभिषेक दुपारी 12.00 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . हजारो  भक्तांनी महाप्रसादाचा  लाभ घेतला.
      कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नवशक्ती मंडळ चे अध्यक्ष रवी बेलुरकर , दौलत वाघमारे ,प्रमोद लोणारे,चंदन मोहूर्ले, शिवा, आसुटकार ,नितीन बिहारी, पुरुषोत्तम मांदाडे,अमोल बदखल,अविनाश कामटकर,स्वप्नील बिहारी, नितीन मसेवार,धम्मा मनवर,संजय लोणारे,सतीष कामटकर , अमोल मनवर,राजू जयस्वाल,इत्यादी समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad