Type Here to Get Search Results !

शाळा क्र.8 मध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

वणी :

         माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नगरपरिषद वणी शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 31 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 वणी येथे विविध सहशालेय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत नगरपरिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषदेचे आदरणीय मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या मार्गदर्शनात या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रानानुर सिद्दिकी सचिव नूर जहा बेगम चॅरिटेबल ट्रस्ट वणी या होत्या.  बक्षीस वितरक म्हणून मुख्याधिकारी सचिन गाडे  हे होते. याप्रसंगी शाळेकडून महिलांच्या शिक्षणामध्ये अमूल्य योगदानाबद्दल नगरपरिषद शाळा क्रमांक पाचच्या मुख्याध्यापिका मीना काशीकर यांना *सावित्रीची लेक* हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, अमरावती विद्यापीठाचे सीनेट सदस्य गजानन  कासावार,  मयूर मुंदाने , बंडू  कांबळे, मनिषा शिवरकर, रविकिरण आत्राम अविनाश पालवे, आयोजक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार उपस्थित होते. 

       या जयंती कार्यक्रमाअंतर्गत आयोजित  स्वच्छतेचे महत्व व पर्यावरण संवर्धन या विषयावर आधारित निबंध स्पर्धेत प्राथमिक गटातून अर्णव जयपाल डोंगरे या विद्यार्थ्याने प्रथम तर वैष्णवी दिनेश काकडे  द्वितीय व अंबिका जयवंत ओचावार या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक प्राप्त केला. साईनाथ गणेश शिखरे या विद्यार्थ्याला प्रोत्साहन बक्षीस मिळाले .सोबतच उच्च प्राथमिक गटात पुष्पक संजय कांबळे प्रथम क्रमांक, सार्थक गणेश लाटकर द्वितीय क्रमांक, लोकेश प्रवीण गुरूनुले तृतीय क्रमांक तर वैष्णवी सुदामा बघेल हिला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक लक्ष्मी अजय तोडकर तर द्वितीय क्रमांक त्रिशा कमलेश बागळदे, तृतीय क्रमांक कल्याणी मुन्ना मोरे तर प्रोत्साहन पर गौरी शंकर मांढरे या विद्यार्थ्यांना देण्यात आले. तर उच्च प्राथमिक गटामधून प्रथम क्रमांक लावन्या रमेश भट, द्वितीय क्रमांक देवांशू दिलीप गुंजेकार, तृतीय क्रमांक अनिकेत बदखल तर चतुर्थ क्रमांक अक्सा शकील खान या विद्यार्थ्यांना मिळाले. 

      सहशालेय उपक्रम अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक आठ येथे सुद्धा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत कुमारी तृप्ती पेंदोर प्रथम क्रमांक, वर्ग पहिलीची विद्यार्थिनी चारुलता बोरकर द्वितीय क्रमांक तर सलोनी कळसकर तृतीय क्रमांक यांनी प्राविण्य प्राप्त केले. निबंध स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात प्रथम क्रमांक  स्वरा प्रवीण गुरूनुले ,द्वितीय क्रमांक गजराज राजेश परोथी तर तृतीय क्रमांक अर्णव जयपाल डोंगरे यांनी मिळवला. तर उच्च प्राथमिक गटात लोकेश प्रवीण गुरुनुले प्रथम ,द्वितीय क्रमांक  जयश्री राजू शिवरकर, तृतीय क्रमांक  खुशी किशोर वालकोंडावार यांना मिळाला. चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक चतुरी लक्ष्मण डांगे, द्वितीय क्रमांक गौरी शंकर मांढरे तर तृतीय क्रमांक अनुराग धनराज धोबे या विद्यार्थ्यांना मिळाला. तर उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक जयश्री राजू शिवरकर, द्वितीय क्रमांक सुजल रामप्रसाद क्षीरसागर तर तृतीय क्रमांक मयुरी मनोज फटिंग या विद्यार्थ्यांना मिळाला. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चैतन्य केशव पानघाटे, द्वितीय क्रमांक सृष्टी शंकर किनाके तर तृतीय क्रमांक दक्ष शक्ती बर्डे यांनी प्राप्त केला तर प्रोत्साहन पर बक्षीस अर्णव जयपाल डोंगरे याला मिळाले. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक  डिंपल सतीश गुरुनुले, द्वितीय क्रमांक गजराज राजेश परोथी,तृतीय क्रमांक सलोनी विनोद कळसकर तर प्रोत्साहन पर  चतुरी लक्ष्मण डांगे हिला मिळाले. उच्च प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक  जयश्री राजू शिवरकर, द्वितीय क्रमांक प्रतीक हरिकृष्ण सप्रे तर तृतीय क्रमांक  खुशी किशोर वालकोंडावार यांनी प्राप्त केला. नृत्य स्पर्धेमध्ये समूह नृत्यात प्रथम क्रमांक पायल गुरणुले व लावण्या ठाकरे यांनी प्राप्त केला. द्वितीय क्रमांक वर्ग तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तर तृतीय क्रमांक वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. एकलनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी सुरक्षा बडोले, द्वितीय क्रमांक चतुरी डांगे ,तृतीय क्रमांक नायरा किनाके यांनी प्राप्त केला. 

          सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पालक महिलांचे खेळ सुद्धा आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये नाविन्यपूर्ण खेळांमध्ये निशाताई कावळे यांनी प्रथम क्रमांक तर सेव द बलून या गेम मध्ये संगीता कळसकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रांगोळी स्पर्धेत मनीषाताई शिवरकर यांनी प्रथम क्रमांक तर श्वेता सप्रे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय क्रमांक शिवानी नागोसे तर प्रोत्साहन पर अंजली बर्डे यांना मिळाला. 

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जगताप यांनी तर आभार प्रदर्शन निलिमा राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता जकाते, देवेंद्र खरवडे, अविनाश तुंबडे, छाया मांढरे, निशाताई कावडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad