वणी :
लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी जि.यवतमाळ व लायन्स स्कूल च्या वतीने रस्ते वाहतूक, सुरक्षा व वाहतूक नियमावली या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यी सुरक्षितता हिताचा विचार व आवश्यकता लक्षात घेवून लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे उपाध्यक्ष श्री. बलदेवजी खुंगर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चें उपाध्यक्ष श्री. बलदेवजीं खूंगर होते. मार्गदर्शक म्हणुन सिता वाघमारे सहायक पोलिस नियंत्रक वाहतूक शाखा वणी व रूपाली बदखल वाहतूक शिपाई,शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.
अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक करताना आवश्यक कागदपत्रे व लायसन्स तसेच अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांनी वाहन परवाण्याशिवाय चालवू नये असे आवाहन सिता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना केले. तचेच 'गूड टच व बॅड टच' व व्यसनांपासून दूर राहण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन पटवून दिली. प्रास्ताविक श्री किरण बुजोणे यांनी केले तरआभार प्रा. सौ. चित्रा देशपांडे यानी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या