Type Here to Get Search Results !

मनसेचा दणका... नाफेड ला शेतकऱ्यांचा माल घेण्यास भाग पाडले

वणी : 

        मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने शेतकऱ्यांचा सुखदुःखात सोबत आहे. आज वणी येथील नाफेड मध्ये सोयाबीनची खरेदी चालू झाली. शेतकऱ्यांनी हा माल विक्रीस आणल्या नंतर त्यात जास्तं आर्द्रता ( मॉयश्चर) दाखवून व अन्य त्रुटी दाखवून तो माल वापस करून व्यापाऱ्यांना विकण्यास परावृत्त करण्यात येत होते.

       शेतकऱ्यांनी ही बाब मनसेकडे मांडली. यावर तात्काळ प्रतिसाद देत तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार याने आपल्या उमेदवाराचा प्रचार सोडून या ठिकाणी धडक देतं नाफेडला धाऱ्यावर धरले आणि शेतकऱ्यांचा माल घेण्यास भाग पाडले मनसेच्या आक्रमक पावित्रा नंतर शेतकऱ्यांचा सर्व माल नियमानुसार खरेदी करण्यात येत आहे. मनसेच्या या पावित्र्या मुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबून त्यांना न्याय पदरी पडला याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी मनसेचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad