Type Here to Get Search Results !

उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचाराकरिता वणीत जाहीर सभा

वणी - 

          शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी वणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील वसंत जिनिंग लॉन येथे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली संध्या. ०६:३० वाजता सभा होणार आहे. या  सभेला विदर्भातील सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ संपादक बाळासाहेब कुळकर्णी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आ. अभिजित वंजारी, अरविंद देशमुख प्रांतीय अध्यक्ष विमाशी संघ, उत्तमराव गेडाम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad