वणी/प्रतिनिधी : रीडिंग न घेताच अंदाजे बिले देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज रिडिंग न घेता सरासरी बिल दिले आहे. हे बिल पाहून ग्राहकांचे डोळे विस्फारत आहेत. महावितरणचा हा भोंगळ कारभार पाहून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा संताप नागरिकांनी मनसेचे नेते राजु उंबरकर यांच्याकडे व्यक्त करत यावर तोडगा काढण्यासाठी मार्ग काढण्याची मागणी केली. महावितरणचा हा भोंगळ कारभार उघडकीस आल्याने मतदारसंघांतील वणी येथील उप कार्यकारी अभियंता व मारेगाव येथील उप कार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वणी विधानसभा कार्यक्षेत्रात महाविरण कंपनीचे लाखो ग्राहक असून या ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयके त्यांना देण्यास, त्याचे रीडिंग घेण्यासाठी महावितरण कडून कंपन्या नेमण्यात आल्या आहेत. सदर कंपन्यांकडे हे रीडिंग घेण्यासाठी शासन नियमानुसार व ग्राहक संख्येनुसार मनुष्यबळ नाही. सदर सर्व ग्राहकांच्या मीटरची मोक्का पाहणी करून रीडिंग घेणे व त्याना अधिकृत देयके (बिल) देणे अनिवार्य आहे. असे नियम असून देखील मात्र सदर कंपनी हे मीटरची रीडिंग न घेता एका जागी बसून हे सरासरी बिले ग्राहकांना पाठवतात. त्यामुळे वापरापेक्षा जास्त बिले सर्वसामन्यांना येत आहे. याचे काही आकडे हे ५०,००० /- ते ६०,००० /- हजारांच्या वर तर काही काही लाखोंच्या घरात आहेत. सामान्य ग्राहकांना इतक्या रक्कमेचे देयके भरणे शक्य नाही. अशा या अवाजवी रकमेमुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही देयके न भरल्यास मात्र कर्मचारी तात्काळ कर्तव्यदक्षता दाखवत हे वीज पुरवठा खंडित करतात. वीज खंडित करण्यात जेवढी तत्परता कर्मचारी दाखवतात तेवढीच तत्परता वीज बिल देताना दाखवावी अशा शब्दात मनसेने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.हा सर्व प्रकार माहित असताना सुद्धा कोणत्याही काम न केलेल्या कंपनीला जेव्हा लाखो रुपयांचे बिले देण्याची वेळ येते तेव्हा वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कोणत्याही कामाचा आढावा न घेता त्यांच्या बिलांवर सह्या करून त्यांची बिले मंजूर करता याचा अर्थ या अधिकाऱ्यांचा या व्यवहारात हिस्सा आहे. हे सिद्ध होते. यातून सर्व सामान्यांच्या पैशासह शासनाच्या पैशात मोठा अपहार करत आहात. असा आरोप मनसेने केला. त्यामुळे हा सर्व प्रकार वेळीच थांबवून ग्राहकांच्या मीटरचे वास्तव रिडिंग घ्यावे, तशी ग्राहकाकडून आपल्या मिटरची रिडिंग घेतल्याची खात्री करावी, रिडिंग घेतल्यावर नोंद किंवा ग्राहकाची स्वाक्षरी घ्यावी, त्याचबरोबर नादुरुस्त मीटरचे ऑनलाईन तक्रारी करून सुद्धा त्यांना आजपर्यंत नवीन मिटर उपलब्ध झालेले नाही. परिणामी आपल्या विभागाचे वायू गती पथक धाडी टाकून त्यांच्यावर कारवाई करून दंड बजावत आहेत. तरी ह्या विषयात अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व तक्रारी निकाली काढाव्या व ग्राहकांना योग्य ते बिल देण्यात यावे. असे मुद्दे या निवेदनात मांडले गेले आहेत.
यापुढे कोणत्याही ग्राहकांना अवाजवी बिल आल्यास ते कोणताही ग्राहक स्वीकारणार नाही, याला आपण सर्वस्वी जबाबदार रहाल. यापुढे ग्राहकांना नियमित बिले देऊन ग्राहकाना न्याय द्यावा. असे न झाल्यास येत्या ८ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या भोंगळ कारभारा विरोधात तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. प्रसंगी वणी येथील कार्यालयात मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विलन बोधाडकर , सूरज काकडे, धिरज बगवा, प्रशांत जोगी, बादल धांडे, ईश्वर कातारकर, वैभव उपरे तर मारेगाव येथे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, नबी शेख, उदय खिरटकर यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या