Type Here to Get Search Results !

बळीराज्याचं हौसी मर्दानी खेळ म्हणजे बैलांचा शंकर पट..

वणी, शुभम कडू : 

         गत ४०० वर्षाची परंपरा जोपासत तालुक्यातील निलजई येथे या वर्षी बैल गाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आज या शर्यतीचे उद्घाटन पार पडले असुन पुढील २ दिवस ही स्पर्धा चालु राहणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मनसे पक्ष नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते पार पडले तर अध्यक्ष स्थानी वेस्टर्न कोल्ड फिल्डचे वणी क्षेत्राचे महा प्रबंधक आभाससिंग चंद्रा उपस्थित होते. 

शंकरपट महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शविणारा व बळीराजा शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे शंकरपट. बैलगाडा हा मातीतला खेळ गावातील लोकांनी ४०० वर्षांपासून जपला. गेले काही दिवस सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी आणली होती. मात्र येथील कास्तकार अनै शेतकरी नेत्यांच्या पुढाकाराने यावरील बंदी न्यायालयाने उठवली आणि हा खेळ पुन्हा सुरू झाला. यापुढील काळातही या खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम करणार असल्याचे उंबरकर यांनी सांगितले. 

यावेळी उंबरकर यांनी प्रत्यक्ष मैदानात बैलगाडा चालवून या खेळाचा आनंद घेतला. या स्पर्धेसाठी विविध भागातून बैलगाडा मालक हे उपस्थित झाले. यावेळी सर्व शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना  या बैलाचा भव्य कृषी सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी  मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुनभाऊ गोहोकार, गावच्या माजी ग्रा.प सदस्या जोत्संना जुंनघरी, वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, प्रभाकर जांभूळकर, गणेश भोंगडे, प्रशांत निंदेकर, राजू तुरानकर, अनिल डहाके, मारोती भोसकर, संजय निंदेकर, विनोद जांभूळकर, योगेश काकडे, लक्कि सोमकुंवर, वैभव पुराणकर यांच्या सह परिसरातील सर्व प्रतिष्ठीत नागरीक, महिला व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad