वणी/प्रतिनिधी : वांजरी या गावातील विवाहित महिलेने चार दिवसांपूर्वी दिनांक १४ डिसेंबरला कीटकनाशक प्राशन केले होते. या महिलेचे नाव मनीषा विजय नक्षिणे (४०) असून वांजरी या गावी राहत होत्या. मनीषा यांनी कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती घरच्याना मिळताच त्यांनी वणीतील खाजगी रुग्णालयामध्ये महिलेला दाखल केले, तिच्यावर रुग्णालय मध्ये उपचार चालू होते. पण आज दिनांक १८ नोव्हेंबर सोमवारला दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मनीषा यांनी टोकाचे पाऊल का उचलेले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
विवाहित महिलेचा विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू
0
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या