पदकं पटकाविण्यासाठी मेहनत करावी लागते असा संदेश हिंदरत्न मनस्वी पिंपरे हिने बोटोणी ते वणी (३०किमी.) 'स्केट फॉर युवा' अभियानांतर्गत, लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल वणी येथे आयोजित सत्कार कार्यक्रमांत विद्यार्थ्यांच्या समोर मनोगत व्यक्त करताना दिला. जगातील सर्वात लहान वयाची लिंबो स्केटिंग प्रकारामध्ये विक्रम करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर व पदकांची शंभरी पार करून सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या स्केटिंगपटू मनस्वी विशाल पिंपरे (वय ७ वर्ष) हिच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन तिच्या वयाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी शालेय व्यवस्थापनां तर्फे करण्यात आले होते.
शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर यांचे हस्ते मनस्वी पिंपरे हिचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व २१०० रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मनस्वी चे प्रशिक्षक प्रशांत मल, आजोबा विठ्ठलराव पिंपरे,आई स्नेहा व वडील विशाल पिंपरे यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त करताना मनस्वी ला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व मनस्वी च्या उपस्थितीने विद्यार्थी प्रेरणा घेऊन अनेक विक्रम करुन नावारूपास येतील अशा शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या