शहरातील जत्रा मैदान परिसरात शेकडो गायींचे शीर व मांस आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.खुल्या जागेवर गोवंश जनावरांचे शीर व मांस पडून दिसल्याने जनभावना उफाळून आल्या आहेत. त्यांनी गोवंश जनावरांची कत्तल करून शीर व मांस उघड्यावर फेकणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. गो हत्या करणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची शिवजन्मोस्त्व समिती आणी शिवस्वराज्य मंचने मागणी केली. यावेळी बंटी प्रेमकुंटावार,अनिकेत चामाटे, साई नालमवार,गौरव ताटकोंडावार,ओम मदान उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या