महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आणि मनसे वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित 'मनसे गरबा उत्सव २०२६' सध्या वणी शहरात प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित या भव्य महोत्सवाला गरबाप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून, महोत्सवाच्या आठवा दिवशी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कायनात अरोरा हिने हजेरी लावून उपस्थितांचा आणि स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला.
शहरातील राम शेवाळकर परिसरातील भव्य-दिव्य मैदानात या गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कायनात अरोरा यांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्या उपस्थितीत गरब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिकांचा आणि रसिकांचा महापूर शेवाळकर परिसरात लोटला होता. अभिनेत्री कायनात अरोरानेही उपस्थितांना दांडियाच्या तालावर ठेका धरण्यास भाग पाडले, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एकच जोश आणि जल्लोष पाहायला मिळाला.
या स्पर्धेत वयोगटानुसार बक्षिसांची मेजवानी असणार असून यामध्ये दुचाकी गाडी, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन, ओव्हन यासह मौल्यवान वस्तू आणि रोख रकमेची पारितोषिके देण्यात येतील. मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेला हा गरबा उत्सव वणीच्या सांस्कृतिक पटलावर एक ऐतिहासिक आणि भव्य सोहळा ठरत असून, विदर्भभर या महोत्सवाचीच चर्चा रंगली आहे.
या महोत्सवासाठी जतिन राऊत सर, सचिन कुळमेथे, संदीप ठोंबरे, योगेश तुराणकर, साई आपलपेलीवर, जय खुराणा, राणी हांडे आणि आसिफ मिर्जा यांनी प्रशिक्षण दिले आहे. याप्रसंगी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्यासह सर्व मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लक्की सोमकुवर, वैभव पुराणकर, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, इरफान सिद्दिकी, आशिष घनकसार, निलेश झाडे, गौरव पुराणकर, संस्कार तेलतुंबडे, रोहित बुग्गेवार आणि पवन इखारे यांनी अथक परिश्रम घेतले.

