Type Here to Get Search Results !

लोकमान्य टिळक महाविद्यालयात भेसळ जागरुकता कार्यक्रम संपन्न


 वणी : 


         शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे सध्याच्या काळात सर्वत्र अत्यंत भीषण समस्या रूपात पसरलेल्या आणि त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळी बद्दल विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध स्वरूपातील माहिती मिळावी या दृष्टीने अन्नामधील भेसळ आणि जागरूकता हा कार्यक्रम घेण्यात आला. 

      

       दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झालेली आहे या कार्यक्रमात रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या द्वारे प्रत्यक्ष रासायनिक प्रयोग करून दाखवण्यात आले.

         

      या जीव घेण्या समस्येवर आळा घालण्याकरीता शासकीय यंत्रणा आपल्या पातळीवर काम करीत असते. परंतु भ्रष्ट यंत्रणेमुळे भेसळ करणाऱ्यांचे पेव फुटलेले आहे. विद्यार्थांमधे अन्नातील भेसळ कशी ओळखावी? त्याकरीता जागरूकता निर्माण व्हावी म्हणून रसायनशास्त्र विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


            या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रसाद खानझोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख प्रा राहुल ठेंगणे यांनी भेसळ ओळखण्याकरीता रसायनशास्त्राचे महत्व अधोरेखित केले. प्रा. डाॅ. प्रशांत लिहीतकर यांनी अन्न भेसळ ओळख़ण्याची विद्यार्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.


           विशेष करून बि.एस्सी. भाग ३ च्या विद्यार्थांनी भेसळ ओळखण्याचे रासायनिक प्रत्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमामध्ये साधारण ८० विद्यार्थांनी सहभाग घेतला.  

  

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत मडावी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रणव ठमके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेकरीता राजु आगलावे, जयंत व्यवहारे आणि कुशाल झाडे आणि यांनी विशेष सहकार्य केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image