येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात सेवा संकल्प उपक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी सर होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. अनिता टोंगे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा आणि देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा आपल्या भाषणातून आढावा घेतला.
सेवा संकल्प उपक्रमांतर्गत विद्यालयात तीन दिवस विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची आणि कार्याची ओळख करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रतिश लखमापुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. तुषार घाणे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

