यवतमाळ :
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सागर इंगोले यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी प्रहारचे नगरसेवक तथा माजी जिल्हाध्यक्ष बिपीनभाऊ चौधरी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी कोल्हे, जिल्हा सल्लागार ओमप्रकाश राठोड सर, जिल्हा सचिव संजयजी गोदमले सर, जिल्हा सर्कल प्रमुख, सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सागर इंगोले यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या आणि हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठविला जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर सागर इंगोले यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या