Type Here to Get Search Results !

वणीत सहकार प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



वणी (प्रतिनिधी) : 

      महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यवतमाळ आणि श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहकार प्रशिक्षण शिबिर’ वणी येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये उत्साहात पार पडले. पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी आयोजित या शिबिराला संचालक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदासजी काळे होते. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी कार्याध्यक्ष श्री. राजुदासजी जाधव, महासचिव श्री. शांतीलालजी सिंगी, कोषाध्यक्ष श्री. दादारावजी तुपकर, उपकार्याध्यक्ष श्री. सुदर्शनजी भालेराव, संचालक श्री. धनंजयजी तांबेकर व तज्ज्ञ संचालक प्रा. कवडूजी नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


          प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विवेकानंद मांडवकर यांनी केले. शिबिरात व्यवस्थापन कौशल्ये, निधी व्यवस्थापन आणि संचालक मंडळाची भूमिका या विषयांवर काकासाहेब कोयटे, प्रा. कवडूजी नगराळे व धनंजयजी तांबेकर यांनी मार्गदर्शन केले. पतसंस्थांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पारदर्शकता, शिस्त आणि योग्य आर्थिक नियोजनाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.


          याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. परीक्षित एकरे, पुरुषोत्तम बद्दमवार, लिंगारेड्डी अंडेलवार, सुधीर दामले, हरिशंकर पांडे, रमेश भोगळे, सुरेश ता. बरडे, ॲड. घनश्याम निखाडे, डॉ. भुपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, उदय रायपुरे, अरविंद ठाकरे, सुनील देठे, सौ. छायाताई ठाकूरवार व सौ. निमाताई जीवने यांची उपस्थिती होती.


           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय दोरखंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. परीक्षित एकरे यांनी मानले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे हे प्रशिक्षण शिबिर पतसंस्था क्षेत्रासाठी उपयुक्त ठरले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad