Type Here to Get Search Results !

पावसाच्या सरींमध्येही धावले युवा, ‘नमो युवा रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद


 वणी : 

       पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी विधानसभा यांच्या वतीने शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी ‘नमो युवा रन – नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तथा लोकमान्य टिळक चौक येथून सकाळी ६.३० वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली.


           रिमझिम पावसाची संततधार सुरू असतानाही युवक-युवतींमध्ये मॅरेथॉनबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला. सुमारे २५० स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत नशामुक्त भारताचा संदेश दिला.


          स्पर्धेतील विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना माजी आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


 📌 स्पर्धेतील विजेते :- 


गट-अ : १६ वर्षांखालील मुले

प्रथम – शिवम भोलेनाथ ओझा

द्वितीय – हसन नूर सय्यद

तृतीय – मोहम्मद फयाज अली

चतुर्थ – वेद राजू देठे


गट-ब : १६ वर्षांखालील मुली

प्रथम – नव्वा श्रीराम पिदुरकर

द्वितीय – प्रणाली प्रकाश ठाकरे

तृतीय – हिमांशी प्रेमदेव कावडे

चतुर्थ – तनुश्री संजय टिकले


गट-क : १६ वर्षांवरील मुले

प्रथम – पियुष संतोष पदलमवार

द्वितीय – आकाश श्रावण ठमके

तृतीय – क्रिश सतीश मिस्त्री

चतुर्थ – सौरभ अरुण दरणे


गट-ड : १६ वर्षांवरील मुली

प्रथम – गौरी रामदास पांभूळकर

द्वितीय – अल्फिया शफी शेख

तृतीय – शास्वती कवडू बुरडकर

चतुर्थ – खुशबू मारोती निखाडे


          या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. श्री. दिलीप मालेकर सर, श्री. महेश पहापळे, श्री. बंटी शेंडे, श्री. संतोष बेलेकर सर, वणी पोलीस स्टेशन, वणी वाहतूक पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय वणी, नगर परिषद वणी तसेच शिवशाही ॲम्ब्युलन्स यांचे विशेष सहकार्य लाभले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, वणी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


          बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन श्री. राजू गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भारतीय जनता पार्टी वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांनी केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016