Type Here to Get Search Results !

सुशगंगा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वणीचा BCA-BBA निकाल देदीप्यमान, प्रथम वर्षाचा 90 टक्के निकाल


 वणी :


       येथील नामांकित सुशगंगा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वणीचा नुकताच जाहीर झालेला BCA व BBA अभ्यासक्रमांचा निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला असून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. यंदा प्रथम वर्षाचा एकूण 90 टक्के निकाल लागल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.


       BCA प्रथम वर्षात शिफा श्यामशुद्दीन सय्येद हिने 9.05 SGPA मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सायन संजय आवारी (8.63 SGPA) याने द्वितीय, तर फाल्गुनी राजू डोंगरकर (8.58 SGPA) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

BBA प्रथम वर्षात परी उदय बोथरा हिने 8.27 SGPA मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. अयान दिलशाद वेग आणि युतीका सामय्या कोंकटवार यांनी प्रत्येकी 7.91 SGPA मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.


         संस्थेच्या दर्जेदार शिक्षण पद्धती, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित प्रात्यक्षिके आणि महाविद्यालयातील अद्ययावत शैक्षणिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना हे उल्लेखनीय यश मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.


        या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिनवार, उपाध्यक्ष मोहन बोनगिनवार, महाविद्यालयाच्या प्राचार्या पुष्पा राणी, विभागप्रमुख व्यंकटेश जीवन कवरासे, विभागप्रमुख नकुल कैलास मेसेकर, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच हे यश संपादन करता आल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


           विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वणी परिसरातील नागरिकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016