वणी :
शिवसेना वणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना जिल्हा संघटक, यवतमाळ श्री. विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून आज, शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी वणी येथे ‘भव्य तान्हा पोळा उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता शासकीय मैदान, पाण्याची टाकी, वणी येथे हा उत्सव पार पडणार आहे.
तान्हा पोळ्याच्या माध्यमातून बालगोपालांना महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा व संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात विविध वयोगटांतील बालकांसाठी आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना २० सायकलींसह इलेक्ट्रिक त्रिचक्री, त्रिचक्री व स्कूटर अशी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.
० ते ४, ४ ते ६, ६ ते ८ आणि ९ ते १२ वर्षे अशा चार वयोगटांत स्पर्धा होणार आहे. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णतः निःशुल्क असून एकूण ३०० नोंदणीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
तान्हा पोळा हा बालकांच्या आनंदासोबतच शेतकरी व बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर वणी शहरातील व परिसरातील नागरिकांनी आपल्या बालगोपालांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक श्री. विजय चोरडिया यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या