Type Here to Get Search Results !

दारूमाफिया Chill... System Silent ? प्रहारचा संताप!


 वणी : 

       तालुक्यात कथितपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाने प्रशासनाविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. "दारूमाफियांना नेमके अभय कोणाचे?" असा थेट सवाल उपस्थित करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांकडे धडक देत निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी केली आहे.


       प्रहारच्या म्हणण्यानुसार, वणी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी कथितपणे अवैध दारूचा व्यवसाय खुलेआम सुरू असून, संबंधित यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात काही अधिकाऱ्यांचे अवैध दारू व्यावसायिकांशी कथित आर्थिक संगनमत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी करण्यात आली.


      "जर आरोप निराधार असतील तर चौकशीत सत्य स्पष्ट होईल; मात्र आरोप सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई झालीच पाहिजे. दारूमाफियांना पाठीशी घालणाऱ्यांना कोणतीही माफी नाही," अशी भूमिका प्रहारने मांडली.


       यावेळी प्रशासनाला थेट इशारा देत, "निवेदनाची दखल घेतली नाही, अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई झाली नाही आणि निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्ष जनतेसह रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असेल," असा इशारा देण्यात आला.


      यावेळी सतीश देरकर (विधानसभा अध्यक्ष), रघुवीर कारेकर (प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष), धनराज भलामे, रशीद शेख, तबरेज सिद्दीकी, मंगेश मडावी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


    या प्रकरणामुळे वणी तालुक्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता राज्य उत्पादन शुल्क विभाग या गंभीर आरोपांवर नेमकी कोणती कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad