Type Here to Get Search Results !

लोकप्रिय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा


 बल्लारपूर : 


     माजी अर्थ, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चुनाभट्टी (विसापूर) येथे भक्तिमय वातावरणात अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


     यावेळी पूजा-अर्चना, भजन व सामूहिक प्रार्थना करून मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.


        या कार्यक्रमास बल्लारपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री हरीशजी शर्मा, बल्लारपूर ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष श्री किशोरभाऊ पंदीलवार, भाजपा महामंत्री श्री गणेशजी टोंगे तसेच भाजपा कार्यकर्ते श्री गजानन पाटणकर, श्री विलास भोयर, श्री किशोर चोपडे, श्री सुरज टोमटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       यावेळी उपस्थित मान्यवरांनी मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad