Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना मिळाले व्यासपीठ; विज्ञान प्रदर्शनी संपन्न

वणी : 

          येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत शाळेतील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी विज्ञान व पर्यावरणाशी संबंधित विविध आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रतिकृती सादर करून आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले.


         प्रदर्शनीचे परीक्षण जनता विद्यालय, वणी येथील श्री. राजेंद्र जेनेकर सर आणि श्री. नरेश बेलेकर सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे बारकाईने निरीक्षण करून त्यांच्या कल्पना, सादरीकरण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.


          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाधिष्ठित विचारसरणी विकसित करण्याचे महत्त्व पटवून देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळत असल्याचे सांगितले.


       कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रभुदास नगराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. तुषार घाने यांनी केले. विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad