अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) वणी नगरच्या सत्र २०२६-२७ साठीच्या नगर कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. विद्यार्थी संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासोबतच विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांचे नेतृत्व विकसित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
सत्र २०२६-२७ साठी वणी पुढील प्रमाणे कार्यकारिणीची घोषणा निर्वाचन अधिकारी वैभव देहेकर यांनी केली. शहर अध्यक्ष चैतन्य तुरविले, तर नगरमंत्रीपदी अंकित भालेराव यांची निवड करण्यात आली. नगर सहमंत्रीपदी वेदांत भोयर यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत राष्ट्रीय कलामंच संयोजकपदी योगिनी खारकर, तंत्रशिक्षण प्रमुखपदी प्रतीक बोंडे, विकासार्थ विद्यार्थी विभाग प्रमुखपदी नमन रावणहत्ते, SFS प्रमुखपदी प्रणव ओझा, खेलो भारत संयोजकपदी पियुष वाढई, सहसंयोजकपदी यश गायकवाड, मीडिया संयोजकपदी विवेक झाडे, सोशल मीडिया संयोजकपदी आयुष अक्कलवार, कार्यालय मंत्रीपदी विधान फुल्लेवार, नगर छात्रा प्रमुखपदी अश्विनी डाहुले यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या सदस्य म्हणून केशर रायपुरे, तनवी धानोरकर, गौरी बर्डे, करण मेडपटलवार, विनय पुरणकर आणि समीर राऊत यांचा समावेश करण्यात आला.
यावेळी निर्वाचित अधिकारी म्हणून प्रा. वैभव दहेकर, प्रा. चैतन्य तुरविले, वणी जिल्हा संयोजिका आयुष्य फुलेवार, दक्ष राजुरकर, नयन क्षीरसागर आणि वणी जिल्हा विद्यार्थी विस्तारक जय टोंगे यांच्यासह अभाविपचे इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त कार्यकारिणीचे उपस्थितांनी अभिनंदन करून आगामी सत्रात विद्यार्थीहिताचे प्रश्न, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम तसेच संघटनात्मक कार्य प्रभावीपणे राबविण्याच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या