Type Here to Get Search Results !

रस्त्याकडेला उभी केली मोटारसायकल... पुढे जे घडलं ते धक्कादायक!


 वणी :

        तालुक्यातील सावर्ला येथील एका शेतकऱ्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावर्ला येथील गणेश सदाशिव अवगान (वय ३९) हे ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर प्रो (क्र. MH-29 AL-5689) ही मोटारसायकल घेऊन शेतात गेले होते. शेत रस्त्यापासून आत असल्याने त्यांनी वणी-वरोरा मार्गालगत काका सुरेश उद्धवराव अवगान यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करून शेतात कामासाठी प्रवेश केला.


        सुमारे एका तासानंतर, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. त्यांनी परिसरात तसेच गावात शोध घेतला; मात्र मोटारसायकलचा कोणताही मागमूस लागला नाही.


       चोरीस गेलेली मोटारसायकल काळ्या-निळ्या रंगाची असून, मोटारसायकलची अंदाजे किंमत १८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad