Type Here to Get Search Results !

ट्युशनला गेलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता, वणी पोलिसांत गुन्हा दाखल


 वणी : 

         शहरातील एका परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 137(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


        पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संबंधित मुलगी वणी येथील एका शाळेत इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे. ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेल्यानंतर दुपारी घरी परतली. त्यानंतर कपडे बदलून ट्युशनला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही.


      कुटुंबीयांनी परिसरातील तसेच नातेवाईक व मैत्रिणींकडे तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad